Thursday, August 7, 2025
HomeMain Newsएकीव धबधब्यामध्ये दोन तरुणांचा पडून मृत्यू झालेला नसून ढकल्यामुळेच झाला

एकीव धबधब्यामध्ये दोन तरुणांचा पडून मृत्यू झालेला नसून ढकल्यामुळेच झाला

जावळी तालुक्यातील एकिव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून  दोन तरुणांचा मुर्त्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती .या घटनेचा पोलिसांकडून तपास  केला असता . या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून दिल्यामुळेच मुर्त्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . वादावादीमध्ये अनोळखी दोन पर्यटकांनी दोघा तरुणांना दरीत ढकलून दिले . हा प्रकार प्रतक्ष पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ,कि जावळी तालुक्यातील एकिव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी सातारा शहर परिसरातील गावातील काही युवक गेले होते . यामध्ये पंकज शिंदे ,समाधान मोरे (बसाप्पाची वाडी ता . सातारा ) आणि अक्षय अंबवले ,गणेश फडतरे  हे चौघेही एकत्र धबधबा पाहण्यासाठी गेले होते . साधारणतः सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंकज शिंदे आणि समाधान मोरे हे दुचाकीवरून पुढे निघाले . यावेळी त्यांना जाताना पाहताच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून अक्षय अंबवले  आणि गणेश फडतरे या दोघांनी पहिले . खूप वेळ झाला तरी ते दोघे अद्याप आले नाहीत . म्हणून पंकज शिंदे हा दुचाकीवरून परत त्यांना पाहण्यासाठी आला . त्यावेळी दोन तरुण अक्षयला लाथाबुक्यांनी मारहाण करीत होते . तर त्यांच्यासोबत असलेली इतर मुले रस्त्यावर उभी होती . गणेश फडतरे हा भांडणे  सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही ती मुले मारहाण करू लागली . त्यानंतर त्या दोन मुलांनी अक्षय आणि गणेशाला ७०० फूट खोल दरीत ढकलून दिले . पंकज  शिंदे व त्यांचा मित्र समाधान येथे येताच सर्व मुले तेथून पळून गेली .

या प्रकानंतर पंकजने मेढा पोलीस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले . रात्री मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक होते . अशा अवस्थेतही ट्रेकर्सच्या जवानांनी दरीत उतरुन अक्षय शामराव अंबवले वय २८ रा . बसाप्पाचीवाडी ता . सातारा गणेश अंकुश फडतरे वय ३४ रा. करंजे पेठ सातारा या दोघांचा मृतदेह रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरीतून वरती काढला . या दोन्ही मूर्तदेहाचे  शवविच्छेदन  केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments