Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedएकनाथ खडसे यांनी घेतला राजकीय सन्यास

एकनाथ खडसे यांनी घेतला राजकीय सन्यास

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपात घरवापसीदेखील होणार आहे. खडसे यांच्या भाजपप्रवेशाला दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र भाजपमध्ये प्रवेश कधी होणार, याची मात्र अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाहीये.

एकनाथ खडसे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी या पुढे विधानसभेची निवडणुक लढवणार नाही. मी आता विधानपरिषदेचा सदस्य आहे. हे सदस्यत्व असताना दुसरी  आमदारकीची निवडणुक लढवणे योग्य होणार नाही. मी आता विधानसभेची निवडणुक लढवणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच, खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळं खासदारकीची निवडणूकदेखील मी लढवणार नाही. ज्या छोट्या छोट्या निवडणुका आहेत. त्या लढवण्याच्या संदर्भात आजतरी विचार केलेला नाही. असं खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments