Saturday, August 9, 2025
HomeMain Newsउद्यापासून या वेळेत करता येणार बँकांमधील व्यवहार

उद्यापासून या वेळेत करता येणार बँकांमधील व्यवहार

1 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बँकिंग क्षेत्रामधील अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यानुसार आज एक नोव्हेंबर बँकांना रविवारची सुट्टी असल्यामुळे हे सर्व नियम बँकांमध्ये उद्यापासून लागू होणार आहेत. या नियमांमध्ये बँकांच्या वेळांचा देखील समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ईज (EASE) अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखांच्या वर्गीकरणानुसार ग्राहकांसाठी कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.

देशामधील राष्ट्रीयकृत बँक शाखांच्या वेळेत इंडियन बँक असोशिएशनने ग्राहकांसाठी तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. त्या वर्गवारीनुसार सकाळी नऊ ते दुपारी तीन, सकाळी दहा ते सायंकाळी पाच आणि अकरा ते संध्याकाळी पाच अशा तीन वेळांत बँका सुरू राहणार आहेत. आयबीएचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी कामकाज वेळा राज्यस्तरीय बँकर्स समितीने निश्चित केल्या आहेत.

सकाळी नऊ ते दुपारी चार अशी रहिवासी क्षेत्रातील बँकांची वेळ असली तरी ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन अशी वेळ असेल. तर व्यापारी क्षेत्राशी निगडित बँकांची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा अशी असून सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत अशी ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. इतर व कार्यालयासाठी असलेल्या बँकांची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असून ग्राहकांसाठी सकाळी दहा ते पाच अशी राहणार आहे. जिल्हा तसेच शाखानिहाय बँकेच्या वेळेचा तपशील बँक ऑफ महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक शाखेने त्यांच्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकांवर लिहून ते ग्राहकांना समजतील अशा ठिकाणी ठेवायचे आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments