सातारा येथील गोडोलीत उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठया प्रमाणात महसूल देत आहे . या विभागाला तसेच अधीकारी ,कर्मचाऱ्यांना सोई देण्यावर शासनाचा भर आहे . असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले . यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी ,पोलीस अधीक्षक समीर शेख ,उपआयुक्त विजय चिंचाळकर ,अधीक्षक अभियंता संतोष राखडे ,कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव ,उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य ,आदी उपस्थित होते . नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ घर ,तळ मजला पहिला मजला ,असे एकूण २ हजार २०७. ६९ चौ . मी क्षेत्रफळ असणार आहे . त्याचबरोबर विश्रामगृह इमारतीचे बांधकाम होणार आहे . त्याचे क्षेत्रफळ ५०४. ४४ चौ .मी असणार आहे .