उत्तर प्रदेश मधील वाल्मिकी समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा सातारा वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेद केला . यामधील गुन्हेगारांना कठोर शासन करावे व उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . उत्तर प्रदेश सरकार कुचकामी ठरले असून तेथील कायदा व सुव्यवस्था नेसता नाबूत झाली आहे . सर्व सामान्य जनतेला सुरक्षेची हमी दिली पाहिजे परंतु त्या मध्ये उत्तर परदेश सरकार अपयशी ठरले आहे . त्यामुळे तिथे राष्ट्रपती शासन लावू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे .