पुणे बेंगलोर महामार्गारावर कराड तालुक्यातील उंब्रज जवळ तारळी नदीच्या पुलावरून मिनी बस ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये ५ जण जागीच ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत . सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली मिनी बस वासी मुंबई येथून गोव्याकडे निघाली होती . अपघातात तीन पुरुष १ महिला ३ वर्षाचा लहान मुलगा असे पाचजण ठार झाले आहेत . तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकातून हि मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळली आहे . यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात स्थानिक नागरिकांना कळल्यानंतर याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली त्या वेळी पोलिसानी घटना स्थळी धाव घेतली व मदत कार्याला सुरवात केली