Friday, August 8, 2025
Homeदेशईव्हीएम मशिन हॅक होतात का? एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली...

ईव्हीएम मशिन हॅक होतात का? एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली भीती

एका अमेरिकन न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामधील एका टाऊन हॉलमध्ये बोलत असताना एलॉन मस्क यांनी ईव्हीएमचा वापर करुन मतदानात हेराफेरी करता येत असल्याचा दावा केलाय. तसंच निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पुढं डोमिनियन कंपनीच्या मतदान यंत्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, “फिलाडेल्फिया आणि ऍरिझोना व्यतिरिक्त या मशीन्स इतरत्र कुठंही वापरल्या जात नाहीत. या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झालाय. हा एक विचित्र योगायोग आहे. तर संगणकीय प्रोग्राम हॅक करता येऊ शकतात. त्यामुळं ईव्हीएमवर अधिक विश्वास ठेवता येणार नाही. एलॉन मस्क यांनी केलेल्या दाव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर ईव्हीएम मशीन बनवणारी कंपनी डोमिनियननं मस्क यांचा आरोप फेटाळलाय. कंपनीच्या प्रवक्त्यानं म्हटलंय की, “डोमिनियन फिलाडेल्फिया राज्यात सेवा देत नाही. तसंच, आमची मतदान प्रणाली मतदाराला बॅलेट पेपरवर दिलेल्या मताची पुष्टी करण्यास मदत करते. आम्ही अनेक वेळा मशिनच्या मतांची आणि बॅलेट पेपर मतांची मोजणी एकत्र करून ऑडिट केलेत. त्यामुळं यावरुन हे सिद्ध होतं की आमचं मशीन व्यवस्थित काम करतंय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीदेखील एक्स मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशिन हॅक होतात, असं मत व्यक्त केलं होते. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रासह झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी मस्क यांनी ईव्हीएम मशिनबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments