Saturday, August 9, 2025
HomeMain Newsइंग्रजी तर सोडाच, जर्मन भाषा शिकवते ही मराठी शाळा

इंग्रजी तर सोडाच, जर्मन भाषा शिकवते ही मराठी शाळा

इंग्रजीच तर सोडाच, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत थेट परदेशातील जर्मन भाषा शिकवते बीडची ही शाळा. वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा हा बीड जिल्ह्यातील उमरद खालसा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना या भाषेची ओळख झाली असुन ते जर्मन भाषेत आपला परिचय देतात. जर्मन भाषेतील अंक, वर्णाक्षरे गिरवतात. एका बाजूला इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये (English mediam school) आकर्षित होत आहेत. त्याच काळात बीडच्या जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत. केदार जाधव हे जर्मनीमधुन या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास घेऊन जर्मनी येथून (Germany) शिकवतात. त्यांच्या योगदानामुळे या विद्यार्थ्यांना एका नव्या भाषेची ओळख झाली आहे. या शाळेतील उपक्रमशील शिक्षक (Teacher) विकास परदेशी यांनी या नव्या उपक्रमाचे नियोजन केले आहे. या शाळेतील विद्यार्थ्याना देखील पूर्वी खासगी इंग्रजी शाळांचे आकर्षण होते. पण त्या शाळांपेक्षा गुणवत्तेचा दर्जा चांगला असल्याने विद्यार्थी खाजगी शाळेकडून या जिल्हा परिषद शाळेत येत आहेत. जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बाबतीत मागे नाहीत. आजपर्यंत अनेक विद्यार्थी या शाळांमध्ये घडले आहेत. बदलत्या जगाबरोबर ज्ञानाच्या नव्या कक्षा रुंदावत ही शाळा मार्गक्रमण करत आहे. ग्रामीण भागातील ज्या पालकांनी आयुष्यभरात आपला जिल्हा देखील ओलांडला नाही त्याच पालकांची मुले या उपक्रमामुळे आज साता समुद्रापल्याड जाण्याची स्वप्ने पाहत आहेत. या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पंखात साता समुद्रापार झेपावण्याचे बळ निर्माण करणारा उमरद खालसा या जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी आयुष्यातील माईल स्टोन ठरणार आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments