Sunday, March 1, 2026
Homeमहाराष्ट्रआली रे आली बारावीच्या निकालाची बारी आली

आली रे आली बारावीच्या निकालाची बारी आली

पुणे : उद्या (बुधवार, दिनांक ३० मे) दुपारी १ वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.फेब्रुवारी-मार्चमध्ये २०१८ मध्ये राज्य मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी राज्यातून बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे. निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.निकाल या संकेतस्थळावर पहायला मिळतील
1.www.mahresult.nic.in
2.www.result.mkcl.org
3.www.maharshtraeducation.com
4.www.knowyouerresult.com
5.hscresult.mkcl.org
6.http://jagranjosh.com
7. www.bhaskar.com

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments