९ सप्टेबर २०२० दिवशीच वडूजला गोळीबार झाला त्याला ७८ वर्षे झाली. गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना क्रांतिकारक अभिवादन
८ आॅगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकार विरोधी मुंबईच्या गवालीया टँक मैदानावर काँग्रेस च्या अधिवेशनात चले जाव चा ठराव करण्यात आला व करू अथवा मरु असा निर्धार करण्यात आला . यामुळे देशभरात जनता , विद्यार्थी स्वातंत्र्याच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. इंग्रजांनी त्यांना दंडुके व गोळिबाराच्या सहाय्याने दडपणे सुरु केले। ब्रिटिश सरकार विरोधी जनमत जागृतिचे काम अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जात पात , धर्म विसरुन केले।
सातारा जिल्ह्यातील वडुज येथे ९ सप्टेबर १९४२ रोजी गौरिहर सिंहासने, बंडोपंत लोमटे , माणिकचंद दोशी , बापु कचरे , परशुराम घार्गे यांनी प्रयत्न करुन २००० जणांचा मोर्चा वडुज मामलेदार कचेरिवर नेला. मामलेदार – फौजदार यांनी अरेरावी करत मोर्चावर गोळिबार केला. यात वडगाव ( ज.स्वा ) चे परशुराम श्रीपति घारगे , रामकृष्ण चंद्रा सुतार ,किसन बंडु भोसले, पुसेसावळीचे बलभिम हरी खटावकर , कृष्णा दिगंबर खटावकर या पाच जणांना जागेवरच वीर मरण आले. वडगावचे शिदू भिवा सुतार व खाशाबा मारुती शिंदे हे दवाखान्यात हुतात्मा झाले. २४ जण जखमी झाले.
*आज ९ /९/२०२०. आज या घटनेला ७८ वर्षे पुर्ण झाली*।
*या बहाद्दरांना क्रांतिकारक अभिवादन*