Saturday, August 9, 2025
HomeMain Newsआता घर बसल्या स्वतःच कोरोना चाचणी करा, USFDA ची 'सेल्फ टेस्ट किट'ला...

आता घर बसल्या स्वतःच कोरोना चाचणी करा, USFDA ची ‘सेल्फ टेस्ट किट’ला मंजूरी

आता तुम्हाला कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात किंवा प्रयोगशाळेत जाण्याची गरज राहणार नाही. जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कुणालाही घर बसल्या आपली कोरोना चाचणी करता येईल यावर संशोधन सुरु होतं. यातच आता अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने जगातील पहिली ‘सेल्फ कोविड टेस्ट किट’ला मंजूरी दिली आहे. या किटमुळे कुणालाही घर बसल्या आपली कोरोना चाचणी करता येणार आहे. या किटच्या चाचणीचा अहवाल केवळ 30 मिनिटांमध्ये येतो (USFDA approves first self Corona test kit of World).

अमेरिकेच्या ल्यूकिरी हेल्थ या कंपनीने ही सेल्प टेस्ट किट विकसित केली आहे. या किटचा उपयोग आणीबाणीच्या स्थितीत करता येणार आहे. या किटच्या मदतीने स्वतःच आपल्या नाकातील स्वॅब सम्पल घेऊन चाचणी करता येईल. 14 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती घर बसल्या सहजपणे ही चाचणी करु शकणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments