२०१९ ला काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमदेवार श्रीमत छत्रपती उदयनराजे भोसले होते . आणि त्यांच्या विरोधी भाजप शिवसेना युतीचे नरेंद्र पाटील हे उमेदवार होते . २०१९ ला सातारा मतदार संघात ६०. टक्के मतदानाची नोंद झालेली आहे . २०१४ च्या तुलनेत २०१९ ला ३. टक्यांनी मतदान वाढले . राजकीय द्र्ष्टया सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे . दोन लोकसभा निवडणुकीचे उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत . सातारा लोकसभा मतदारसंघात २०१४ ,मध्ये ५७ टक्के मतदान झाले होते .
सातारा लोकसभा मतदार संघाची विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी पहिली तर लोकसभेच्या निवडणुकीचा अंदाज येतो . विधानसभानिहाय मिळालेली ऐकून मतदानाची आकडेवारी
वाई विधानसभा मतदार संघातून २०१४ साली १,७९,९३५ ,२०१९ ला १,९९,२५२ कोरेगाव तालुक्यातून २०१४ साली १,५१,६०१ तर २०१९ ला १,८०,००० मतदान झाले होते . कराड उत्तर मधून २०१४ साली १,५७,६०१ तर २०१९ ला १,८३,२८० मतदान झाले . कराड दक्षिणेमधून १,५८,२७१ तर २०१९ ला १,८२,३७२ मतदान झाले आहे . २०१४ ला पाटण मधून १,४७,०२४ तर २०१९ ला १,६६,३७२ मतदान झाले . सातारमधून २०१४ साली १,८१,३४१ २०१९ ला १,९८,१८५ मतदान झाले . संपूर्ण सातारा लोकसभा मतदार संघामध्ये २०१४ ला मतदान झाले ९,७६,७०२ तर २०१९ मतदान झाले ११,०९,४३४ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना २०१४ साली ५ लाख २२ हजार ५३१ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार पुरषोत्तम जाधव यांना १ लाख ५५ हजार ९३७ मते मिळाली . पुरषोत्तम जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर होते . २०१९ ला राष्ट्वादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात लढत झाली होती . नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातारा लोकसभा मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या २ सभा उद्धव ठाकरेची एक सभा आदित्य ठाकरेंची १ अशा महत्वाच्या ४ सभा झाल्या होत्या . २०२४ मध्ये दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी पक्ष झाल्याने मतदारांमध्ये सभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे . त्यातच माजी खाजदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वस्थामुळे निवडणुकीतून माघार घेतली आहे . त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्षम असा उमेदवार दिसत नाही . लोकसभेच्या निवडणुकीनंतर कळेल कि सातारा लोकसभा संघावर कोणाचे प्रभुत्व आहे . परंतु