Friday, August 8, 2025
HomeUncategorizedआंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं

आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं

साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. साताऱ्यात काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे यांनी काढता पाय घेतला.

साताऱ्यातील राजवाडा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाबरोबरच अनेक आमदार यात सहभागी झाले होते. मात्र फक्त सहभाग घ्या, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे दोघेही मोर्चेकऱ्यांसोबत चालत मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर, शिवेंद्रराजे भोसले हे भाषणासाठी उभे राहिले. मात्र मोर्चेकऱ्यांना त्यांना बोलू दिले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments