Thursday, August 7, 2025
Homeउल्लेखनीयअसा आमचा सातारा

असा आमचा सातारा

बसाप्पा नावाची एक लिगायात  इसम शाहू महाराजांच्या कोठीवर होते .महाराजांनी त्यांच्यावर खुश होऊन त्यांना खुप पैसे दिले .बसाप्पा बहुदा मुलबाळ नसावे .या पैशाचे करायचे काय हा प्रश्न त्यांना पडला.ते पैसे त्यांनी महाराजांना परत करायचे ठरवले .पण महाराज ते पैसे परत घेईनात .त्यात तडजोड म्हणून हे पैसे त्यांनी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी त्यांनी वापरले .बसाप्पाची पेठ हे या बसाप्पाचे स्मारक आहे .यादव गोपाळ पेठ शाहू महाराजांच्या काळात यादव गोपाल  खटावकर हे ताराबाईचे कारभारी होते .त्यांच्या नावावरून यादव गोपाल पेठ हे नाव पडले आहे .या पेठेतील गोल मारुती हि शहराची उत्तर सीमा होती .हा मारुती वेशीचा मारुती म्हणून प्रशिध्द होता .खटावकर यांचे वारस पुढे जामदारखाने म्हणून ओळखले जात.

सातारा शहरातील चिमणपुरा हि पेठ मुळात छत्रपतींचे सरदार असलेले चिमणाजी मोघे यांच्या नवे वसली आहे .चिमणाजी मोघे यांच्या घोड्याच्या पागा या भागात होत्या .शाहू महाराजांनी ;की चिमणाजीस एक छोटी जहागिरी खानदेशात दिली होती .चिमणाजीचे वंशज आजही तेथे आहेत .शाहू महाराजांना शिकारीप्रमाणे मासेमारीचा हि छंद होता .मासे पकडण्यासाठी बारीक सूत लागे .ते सूत  ढवळे या आडनावाचे शिंपी बनवत.यांची वस्ती चिमणपुऱ्यात होती .त्यास धवल पुरा म्हणत.आज सातारमधील ढवळे  या आडनावाचे शिंपी समाजातील लोक मुलांचे इथलेच जनसंघाचे उमेदवार आणि संघाचे प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठा दिवंगत विनयकराव  ढवळे यापैकीच होते .मोती तळ्यात रेशीम बनवणारे लोक रेशीम धुण्यासाठी आणत .मोती तळ्यातील पाण्यात रेशीम धुतले कि त्यास मोत्याप्रमाणे तकाकी येत असे .म्हणून या तळ्यास मोती तळे असे नाव पडले .महाकाय गणेशाचे विसर्जन आणि निर्मलयःचा उकिरडा यामुळे तळ्यास आज विपरीत रूप आले हा भाग वेगळा .अर्थात त्यामुळे नगरपालिकेतील संबंधितांची सफाईच्या नावाखाली हमखास उत्पनाचे साधन हे तळे बनले हा भाग वेगळा .

रामाचा गोट(रामाऊचा) हा भाग मंगळवार पेठेत आहे .या भागात नागपूरकर भोसले राहत .ते १९१४ पर्यंत येथे होते .यांच्या घराण्यातील रामाऊ भोसले या महिलेच्या नावावरून या भागास हे नाव पडले .हि महिला सैन्य बाळगून होती .आणि स्वतःहा युद्धावर जात असे .हे भोसले मूळचे वाई जवळच्या पांडव वाडीचे होते .औरंगजेबाने शाहू महाराजांना पकडून नेल्यावर त्यांच्या बरोबर जे लोक गेले .त्यात जोत्याजी केसकर हि होते .त्यांनी महाराजांची निष्ठेने सेवा केली म्हणून सुटून आल्यावर महाराजांनी त्यांना बिनीचे सरदार केले .त्यांच्या नावाने केसरकर पेठ बनली .दसऱ्याच्या वेळी जरीपटका धरण्याचा मान  या केसरकराना होता .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments