Friday, August 8, 2025
HomeMain Newsअवकाळी पावसाचा सातारा जिल्ह्यात कहर

अवकाळी पावसाचा सातारा जिल्ह्यात कहर

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुरु झालेला पाऊस गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पडत होता . पावसाबरोबरच थंडीचा कडाका होता . या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . ज्वारीचे अक्खी शेतेच भुईसपाट झाली आहेत . पसरणी ,मांढरदेवी घाटात सकाळी दरडी  कोसळण्याचे प्रकार घडले आहेत . तसेच या पावसामुळे जिल्ह्यात ७० बकऱ्यांचा मुर्त्यू थंडीने गारठून झाला आहे . सातारच्या ऐतिहासिक अशा मंगळवार तळ्यातील माशांचा अचानक झालेल्या पावसामुळे ऑक्सिजन कमी झाल्याने मृत्यू झाले . संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे .

अवकाळी पावसाने जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सुरुवात केली दुपारी काहीसा उघडला होता . धुक्याबरोबरच थंडी आणि पाऊस ढगांच्या गर्जना रात्रभर सुरु होत्या . विजांचा लखलखाट सुरू होता . या पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामातील ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . बागायती शेतीबरोबरच जिरायती शेतीचे हि नुकसान झाले आहे . त्यामध्ये महाबलेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले आहे . स्ट्राबेरी उत्पदक शेतकऱ्यांनी तरीही स्ट्रॉबेरीचा तोडा सुरु ठेवला होता . काहीतरी हाताशी लागेल या आशेने हा तोडा सुरु ठेवला होता . वाई तालुक्यातील मांढरदेवी आणि वाई ते महाबळेश्वर या रस्त्यावर पसरणी घाटात गुरुवारी सकाळी दरडी कोसळल्याचे  प्रकार घडले आहेत . त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती . प्रशासने लगेच दरडी हटवण्याचे काम हाती घेतले . त्या नंतर दुपारपर्यंत वाहतूक सुरु करण्यात आली असली तरीही मंद गतीने वाहतूक सुरु होती . पावसामुळे सातारा

पावसामुळे सातारा जिल्ह्यातील शेळ्या व बकऱ्यांचा गारठून मृत्यू झाला . त्यामध्ये खटाव तालुक्यातील मेलदरवाडीतील कुमार मदने यांच्या १५ शेळ्यांचा मुर्त्यू झाला . तर वाई तालुक्यातील देगाव येथील भिरडाचीवाडी येथील शिवाजी शंकर धायगुडे यांच्या २० मेंढरांचा मुर्त्यू झाला आहे . तर खटाव तालुक्यातील हुसेनपूर येथील रामचंद्र चव्हाण यांच्या ४० बकऱ्यांचा मुर्त्यू झाला आहे .

सलग दहा तासात सातारा जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी तालुकानिहाय सातारा ४०. १ मिलीमीटर ,जावळी ५०. १ मिलीमीटर ,पाटण ३१. ९ मिलीमीटर ,कोरेगाव २४. २ मिलीमीटर ,खटाव २४. ८ ,माण ३२. ८ मिलीमीटर ,फलटण २५. ६ मिलीमीटर ,खटाव २७. १मिलीमीटर ,वाई ३०. ८ मिलीमीटर ,महाबळेश्वर ३७. ७ मिलीमीटर असा जिल्यात ३०.५ मिलीमीटर झाल्याची माहिती जिल्ह्याधिकारी कार्यालयातूम देण्यात आली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments