दारू पिऊन शिवीगाळ करत दमदाटी करत असल्याने चिडून जाऊन सुरेश विठ्ठल जाधव वय ४५ राहणार ठोसेघर तालुका सातारा . यांचा अल्पवयीन मुलाने खून केला या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करत डोक्यात दगड घातल्याचे समोर आले आहे ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली . अधिक माहिती अशी सुरेश जाधव हे गवंडी म्हणून तसेच पावनचक्कीवर काम करत होते . मूळचे ते ठोसेघर परिसरातील मायानी येथील आहेत . त्यांना दारूचे व्यसन होते दारू पिल्यानंतर ते शिवीगाळ दमदाटी करत होते . खून करणाऱ्या मुलालाही वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी देते होते त्यामुळे तो घाबरून व चिडून होता . बुधवारी पुन्हा या दोघांमध्ये वादावादी झाली हा वाद एवढा विकोप्याला गेला कि त्यातून अल्पवयीन मुलाने दांडक्याने व दगडाने मारहाण करत सुरेश जाधव यांना रक्तबंबाळ केले . सदरची माहिती मिळ्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता . पोलीस राजेंद्र वंजारी ,राजू शिर्के ,संदीप करणे ,वायदंडे ,शिवाजी डफळे यांचे पथक तयार करण्यात आले . संशयितांची माहिती घेऊन त्यानुसार तात्काळ एकाला ताब्यात घेतले असतो तो मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले . पोलीस संशियत मुलाकडे प्राथमिक चौकशी करत आहेत . दरम्यान घटनेचा पंचनामा करून . दरम्यान या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजार केले आहे .
अल्पवयीन युवकांकडून दगडाने ठेचून ठोसेघर येथे खून
RELATED ARTICLES