अल्पवयीन मुलांनी वाहन चालाविण्याच्या प्रकारवर हैदराबाद मधील पोलिसांनी कारवाहीचा बडगा उगारला आहे .अशा मुलांना वाहन चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी २६ पालकांची रवानगी तुरुंगात केली आहे .पोलिसांनी २३ एप्रिलपर्यत हैदराबाद मध्ये अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याच्या २७३ प्रकरणाची नोंदणी केली असून .त्यांच्याकडून १ लाख ८० हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला आहे .
शहरात वाहन अपघाताच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे अहवाल पोलिसांना मिळाले होते .त्या नंतर हे कार्यवाहीचे पाऊल उचलण्यात आले आहे .या अंतर्गत एका पेक्षा जास्त वेळा पकडल्या गेलेल्या बालकांची रवानगी सुधारग्रहात करण्यात आली आहे .पोलिसांनी पालकांनवरती कारवाई करताना एका अल्पवयीन मुलाला अगोदरच सुधारग्रहात पाठविले आहे .आम्ही मार्च मध्ये २० एप्रिल महिन्यात ६ पालकांना तुरुंगात पाठविले.या वर्षी अल्पवयीन मुलानाकडून वाहन चालविण्याच्या २७३ प्रकरणाची नोद झाली आहे .या सर्वाना न्यालयात हजार करण्यात आले .त्या नंतर या २६ पालकांना कोठडी सुनवण्यात आली .असे हैदराबाद वाहतूक पोलिसांचे आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितले.