सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यामधील कुत्र्यांच्या चाव्याची आकडेवारी समोर आलेली आहे. त्यानुसार मागील अडीच वर्षांच्या काळात तब्बल ५२ हजार ६७६ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतलाय. हे प्रमाण नक्कीच अधिक आहे. तर त्यापूर्वी २०१७ या वर्षात १६ हजार १३१, २०१८ या वर्षात २१ हजार ६८ नागरिकांवर हल्ला केल्याची नोंद आहे. तर २०१९, २० या दोन वर्षात हल्याचे प्रमाण वाढलेले होते. ०१९ मध्ये २६ हजार ३९२ तर २०२० मध्ये २६ हजार २५७ जणांना चावा घेतला आहे.