देशाचे माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीतील ‘एम्स ‘रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे .
एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाणार आहे .वाजपेयांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने तातडीने पत्रक काढून हि नियमित तपासणी असल्याचे म्हटले आहे .भारता सारख्या देशाचे पंतप्रधान पद भूषवणारे वाजपेयी सध्या राजकारणापासून अलिप्त असतात .