बिहार राज्यातील नालंदा संग्रहालयातून ६० वर्षापूर्वी चोरी झालेली गौतम बुद्ध यांची मूर्ती.ब्रिटन सरकारने भारताला स्वतंत्रदिनी अमुल्य भेट म्हणून दिली आहे .१२ व्या शतकातील या बुद्ध मूर्ती वर चांदीची कलाकुसर केलेली असून हि मूर्ती कास्य धातूने बनवलेली आहे .
नालंदा येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या १९६१ साली १४ वेगवेगळ्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या त्यापैकी एक हि बुद्ध मूर्ती होती .
लंडन मध्ये जेव्हा हि मुर्ती लिलावाकरिता ठेवण्यात आली .तेव्हा लंडन पोलिसांच्या ‘कला व पुरतान वास्तु विभागाने सबंधित बुद्ध मूर्तीच्या डीलरला व मालकाला संपूर्ण माहिती दिली .लंडन पोलिसानी त्यांना सांगितले कि हि मूर्ती भारतातील संग्रहालयातून चोरी केलेली आहे .त्यामुळे या मूर्तीचे डीलर व मालक हि मूर्ती लंडन पोलिसांना सोपवायला तयार झाले .तसेच ‘एसोसिएशन फोर रिसर्च इंटू क्राइमस एगेन्स्ट कि लिंडा अल्बर्टसन आणि इंडिया प्राइड प्रोजेक्ट ‘शी संबधित ‘विजय कुमार यांना हि मूर्ती लंडन मधील एका व्यावसायीक कार्यक्रमात दिसली होती याबद्दल त्यांनी लंडन पोलिसांना अगोदरच माहिती दिली असल्याने लंडन मेट्रोपोलिटन पोलीस या मूर्तीच्या शोधात होते .
लंडन मधील ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वतंत्रदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ब्रिटन पोलिसांनी हि बुद्ध मूर्ती भारताचे लंडनमधील राजदूत ‘वाय.के.सिन्हा’यांच्याकडे सुपूर्द केली .या घटनेमुळे ब्रिटनचे ‘कला व पर्यटन ‘मंत्री ‘मायकल एलीस यांनी स्कॉटलंड यार्डच्या ‘कला व पुरतान वास्तू’विभागाची प्रशांसा केली आहे .तसेच वाय.के.सिन्हा यांनी ब्रिटन कडून मिळालेली हि अनमोल बुद्ध भेट म्हणजे भारत व ब्रिटनचे संबंध आणखी सलोख्याचे बनण्यात महत्वपूर्ण पाऊल म्हटले आहे .