Friday, August 8, 2025
HomeMain Newsस्नेहा बनली जातधर्म नसलेली पहिली भारतीय महिला

स्नेहा बनली जातधर्म नसलेली पहिली भारतीय महिला

तामिळनाडू मध्ये वकीली करणारी स्नेहा देशातील पहिली जात धर्म नसलेली महिला बनली आहे. स्नेहाने देशातील पहिले नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र मिळविले असून त्यासाठी सोशल मिडियावर तिचे कौतुतामिळनाडू मध्ये वकीली करणारी स्नेहा देशातील पहिली जात धर्म नसलेली महिला बनली आहे. स्नेहाने देशातील पहिले नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र मिळविले असून त्यासाठी सोशल मिडियावर तिचे कौतुक केले जात आहे. दक्षिणात्य अभिनेता कमल हसन यानेही ट्विटरवर स्नेहाचे कौतुक केले आहे.
स्नेहासाठी हि लढाई सोपी नव्हती. गेली ९ वर्षे ती यासाठी लढा देत होती. तिच्या म्हणण्यानुसार ती भारतीय आहे. कोणत्याही जाती धर्माची नाही. स्नेहाच्या आईवडिलांनीही तिच्या लहानपणापासून कोणताही अर्ज भरताना धर्म आणि जात हे रकाने रिकामे ठेवले होते. एका मुलाखतीत स्नेहा म्हणाली, मी मला भारतीय मानते. आपल्याकडे जन्मापासून मृत्युपर्यंत सर्वत्र जात आणि धर्माचा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे कुठलाही अर्ज भरताना नो कास्ट, नो रिलीजन असे सामुदायिक प्रमाणपत्र आवश्यक होते.
यासाठी स्नेहाने ती कोणत्याही जाती धर्माशी जोडलेली नाही असे आत्मशपथपत्र सादर केले होते आणि २०१० मध्ये नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला आणि अनेक अडचणींना तोंड देत असे प्रमाणपत्र ५ फेब्रुवारी २०१९ ला मिळविले. स्नेहाने तिच्या तीन मुलींच्या जन्मावेळीही जात आणि धर्म हा रकाना रिकामा ठेवला होता. स्नेहाने उचललेले हे पाउल धैर्याचे आणि गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
क केले जात आहे. दक्षिणात्य अभिनेता कमल हसन यानेही ट्विटरवर स्नेहाचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments