Sunday, March 8, 2026
HomeMain Newsसाताऱ्यात वकिलावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी न्यायालयाचे कामकाज बंद

साताऱ्यात वकिलावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी न्यायालयाचे कामकाज बंद

सातारा येथील  वकील राममोहन खारकर  यांच्यावरील  शाहूनगर परिसरात शनिवार दिनांक १२ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११. ०० च्या सुमारास जबरी प्राणघातक हल्ला करणेत आला . त्यात त्यांच्या उजव्या डोळ्यावर घाव झाल्याने तो कायमस्वरूपी निकामी झाला आहे . अशाप्रकारे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने या घटनेचा  निषेध सातारा जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या प्रकाराबदल निषेध सभा घेण्यात अली . या सभेस सर्व वकील संघटनेच्या सभासदांनी आपल्या  तीव्र भावना व्यक्त केल्या व झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे . सातारा न्यायालयातील संपूर्ण काम बंद ठेवण्यात आले आहे . तसेच या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ठराव हि घेण्यात आलेला आहे . सातारा न्यायालय व सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयातील वकील सभासदांनी कामकाज बंद ठेवले होते .

या घटनेच्या निषेधासाठी सातारा न्यायालयामध्ये झालेल्या निषेध सभेचे प्रस्ताविक सातारा वकील संघटनेचे उपाध्यक्ष  चंद्रकांत बेबले यांनी केले . त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच घडलेल्या घटनेचा मागील दोन दिवसाचा आढावा सभागृहास दिला  व सुरु असलेल्या तपासाची माहिती सभागृहास दिली . यानंतर वकील नितीन वाडेकर ,शामप्रसाद बेगमपुरे ,पी .एन . पवार ,सुभाष देशमुख ,मिलिंद ओक ,महेश कुलकर्णी ,प्रशांत खामकर ,आदी वकिलांनी आपल्या भावना व्यक्त करून आपले मत मांडले .

सर्व वकील संघटनेच्या सभासदांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून न्यायालयीन कामकाजापासून एक दिवसासाठी अलिप्त राहणेचा निर्णय केला . याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे या घटनेकडे गांभीर्याने पाहणेसाठी विनंती केली आहे . सध्या वकिलांवरील हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे . तरी याकडे राज्यशासनाने देखील गांभीर्याने पाहून वकिलांना सरक्षण देणारा कायदा निर्माण करणेत यावा यासाठी देखील मागणी केलेली आहे . तसेच या घडलेल्या घटनेमधील दोषी आरोपीना लवकरात लवकर पकडण्यात यावे व त्यांचेवर जास्तीजास्त कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदना  माध्यमातून करण्यात आली आहे . या घटनेचा तीव्र निषेध सातारच्या जिल्हा न्यायाधीस मंगला  घोटे यांनी केला . सभेस कार्यकारिणीतील वकील स्वाती गव्हाणे ,पृथ्वी पवार ,अनुप लकडे ,आदित्य पाद्य ,योगेश काळंगे ,करण पालकर ,ऋषाली गाढवे ,पूया निषेध सभेचा ठराव वकील सुखदेव पाटील यांनी मांडला त्यास सभासदांनी अनुमोदन दिले . तर प्रस्तावित वकील चंद्रकांत बेबले यांनी केले . उपस्थित असलेल्या सभासदाचे आभार वकील संभाजी कदम यांनी मानले . नम कुंभार ,पेंढारी व सभासद उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments