Thursday, June 26, 2025
HomeMain Newsसातारा शहरात विना नोंदणी दुचाकी वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल

सातारा शहरात विना नोंदणी दुचाकी वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी ना करता बनावट  नंबर प्लेटच्या आधारावर दुचाकी वापरणाऱ्यावर काल  रात्री सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . शिशिकांत सुनील पिसाळ व राहुल चंद्रकांत माने अशी गुन्हा दाखल असणाऱ्यांची नावे  आहेत . श्रीधर जगदाळे यांची एम .एच – ११- सी . सी ८८८७ या नंबरची दुचाकी आहे . सातारा परिसरात कामासाठी न येता हि त्यांच्या दुचाकीवरील ऑनलाईन दंडाची आकारणी होत होती .सहा वेळा  हा प्रकार घडल्या नंतर त्यांनी सातारा वाहतूक शाखेशी सपंर्क  साधलं असता  हा   प्रकार उघडकीला आला आहे . चोरीच्या वाहनामध्ये  असे प्रकार घडत असतात .गाडीचा नंबर चुकीचा लावून त्या वाहनाचा वापर केला जातो . या अगोदर अशीच एक घटना पाठीमागे सातारमध्येच घडली होती .त्यामुळे  कायद्याचे पालन करून वाहन चालवणाऱ्या  लोकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते . आणि विनाकारण त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करावी व त्यांच्या वर कादेशीर कारवाही करावी अशी मागणी नारिकांनमधून होते आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments