सातारा – लोणंद महामार्गावर असलेल्या वडूथ गावाच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास साबळे मॉल जवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे . या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच मुर्त्यू झाला आहे . सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे . घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी . सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरखळ येथील दिलीप खांडेकर हे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली . या धडकेत दिलीप खांडेकर हे जागीच ठार झाले आहेत . या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला आहे . ट्रक चालक अपघात संस्थळावरुन फरार झालेला आहे . या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपस सातारा पोलीस करीत आहेत .



