Friday, August 8, 2025
HomeMain Newsसातारा लोकसभा मतदार संघात रस्ते व पुलांसाठी १६ कोटी ६० लाख मंजूर...

सातारा लोकसभा मतदार संघात रस्ते व पुलांसाठी १६ कोटी ६० लाख मंजूर – खा . श्रीनिवास पाटील

खा . श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माहे मार्च २०२२च्या अर्थसंकल्पामध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील वाई ,जावळी ,कराड ,तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे ,त्यासाठी १६ कोटी ६० लाख निधी उपलब्ध झाल्याने सदर कामाला गती मिळणार आहे . कराड तालुक्यातील ,खंडाळा -कोरेगाव ,कराड – सांगली -शिरोळ रस्ता रा. मा . १४२ वरील कि . मी ८५/७००  येथील तारगाव फाटा चौकाची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी निधी मंजूर झाला आहे . जावळी तालुक्यातील सातारा -कास ,बामणोली -गोगवे -तापोळा – महाबलेश्वर रस्ता (प्रजिमा-२६) कि . मी ४३/४०,४४/८००./६०० व ५२/७५० मध्ये लहान पुलाचे पोहोचमार्गासह बांधकाम करणे २ कोटी ६६लाख ,वाई  तालुक्यातील प्रजिमा -१९ ते एकसर -कुसगाव-पसरणी -राजेवाडी -वाई -बावधन – कनूर -दरेवाडी रस्ता प्रजिमा -९२ कि . मी २/८०० ते ११/५०० (भाग- एकसर ते वाई ) रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी ८० लाख ,वाई तालुक्यातील चवनेश्वर ते कवढे पोल्ट्री फार्म ते राष्ट्रीय महामार्ग – क्र . ४ ते बोपेगाव स्माशानभूमी खानापूर ते राज्यमार्ग – ११९ ते केंजळ -गुळूब -वेळे -भिलारवाडी ते सोळशी रस्ता प्रजिमा -१४६ कि . मी २/००ते ९/००(भाग कवठे पोल्ट्री फार्म ते रा . मा . ११९) रस्त्याची सुधारणा करणे ७ कोटी ६० लाख असा भरघोस निधी मंजूर झाला आहे . खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मुळे साद कामांना भरीव निधी मंजूर झाल्यामुळे हि कामे पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या मार्गी लागून दळवळन सोईस्कर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments