सातारा आगारातून पुणे -सातारा महामार्गावर धावणाऱ्या विना वाहक विना थांबा सेवेसाठी लवकरच महामंडळामार्फत १५ सुसज्ज नवीन बसेस देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यश मुख्य व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा व सांगली विभागाची आढावा बैठक साताऱ्यात पार पाडली त्यावेळी ते बोलत होते . बैठकीस महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण,संजय सुपेकर ,यंत्र विभागाचे महाव्यवस्थापक कांबळे ,उपमहाव्यस्थापक अमित गायकवाड ,मुख्य सांख्यिकी अधिकारी उपस्थितीत होते . व्यवस्थापक संचालक शेखर चन्ने यांनी सातारा व सांगलीच्या विभाग नियंत्रकांकडून विभाग निहाय कामकाचा आढावा घेतला . सातारा व सांगली विभागातील सर्व आगारांनी आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी तसेच उत्पन वाढीच्या हेतूने प्रयत्न करण्याच्या सूचना शेखर चन्ने यांनी दिल्या . सातारा महामार्गावर धावणाऱ्या विना थांबा बससेसना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे . त्यामुळे या मार्गावर महामंडळामार्फत सर्व सोयी सुविधांनी सुज्ज अशा नव्या १५ बसेस लवकरच सातारा आगारला देण्यात येणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले .



