Wednesday, March 4, 2026
HomeMain Newsसातारा जिल्ह्यात दरवषी नोंदणी पद्धतीने होतात तीनशे विवाह

सातारा जिल्ह्यात दरवषी नोंदणी पद्धतीने होतात तीनशे विवाह

विवाहासाठी कायदयाने वय ठरून दिलेले आहे . मुलांसाठी २१ वर्ष तर मुलींनसाठी १८ वर्ष या वयातील मुलामुलींना कादेशीर लग्न करता येते . प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने लग्न करीत असतात . काही विवाह घरगुती पद्धतीने तर काही मंदिरात व काही मंगलकार्यालयात  लग्ने होत असतात . परंतु नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्याची संख्या फारच कमी आहे . संपूर्ण सातारा जिल्ह्यात दरवर्षी नोंदणी पद्धतीने २५० ते ३०० विवाह होतात . विवाह नोंदणी कार्यालयात विशेष नोंदणी कायद्या अंतर्गत विवाह करता येतो . यासाठी शासनाच्या काही नियम व अटी हि असतात . त्यामध्ये वधू किंवा वर दोघांपैकी एक जण जिल्ह्यातीलच रहिवाशी असणे बंधन कारक असते . जर कुणी हरकत घेतल्यास विवाह करता येत नाही . कोरोना काळात तरुणाचा नोंदणी पद्धतिने विवाह करण्याकडे कल  वाढला आहे . नोंदणी पद्धतीने केलेल्या विवाहा मध्ये अनावश्यक खर्च वाचतो . २०१९ मध्ये ३१८ विवाह झाले असून चालू वर्षी १९८ विवाह झाले आहेत . नोंदणी पद्धतीने विवाह होण्यासाठी शासन पातळीवर जास्ती जास्त प्रबोधन होणे गरजेच आहे व नोंदणी पद्धतीने विवाह करण्याऱ्या जोडप्याना  प्रोत्साहन  देणे गरजेचे आहे . काही वेळेस कायद्यामध्ये हि सुलभपणा  आणणे गरजेचे आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments