कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता . खटाव येथील एक ४५ वर्षीय पुरुष ,कुंभारगाव ता . पाटण येथील ७० वर्षीय पुरुष ,म्हावशी ता . पाटण येथील ४५ वर्षीय पुरुष व ऊब्रज ता . कराड येथील ४० वर्षीय पुरुष असे एकूण ४ जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . आमोद गडीकर यांनी दिली . क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ३१ ,कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे ३९, ग्रामीण रुग्णालय वाई येथे ७,उपजिल्हा रुग्णालय ,फलटण येथे ११,ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे २३ असे एकूण १११ जणांना विलानीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे . या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत ,अशी माहिती शल्यचिकीत्सक यांनी दिली .