Friday, August 8, 2025
HomeMain Newsसलग दुसऱ्या दिवशी ट्रक चालकांचा संप; वाहतुकीवर परिणाम तसेच भाजीपाला,पेट्रोल ची टंचाई

सलग दुसऱ्या दिवशी ट्रक चालकांचा संप; वाहतुकीवर परिणाम तसेच भाजीपाला,पेट्रोल ची टंचाई

केंद्र सरकारच्या नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूक युनियनच्या संघटनांनीनी सलग दुसऱ्या दिवशी हि आपला संप सुरूच ठेवला आहे. सरकारने केलेल्या या नव्या कायद्यात १० वर्षाची शिक्षा आणि ७ लाखाच्या दंडाची तरदूत केली आहे. हा नवा कायदा आमच्यासाठी अन्यायकारक आहे असे म्हणत महारष्ट्रातील ट्रान्स्पोर्ट युनियन या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.फळे,अन्नधान्य,फळे,भाजीपाला व इंधन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे .त्याची टंचाई होण्यास सुरवात झाली आहे .पेट्रोल व डीझेलसाठी नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. नाशिक मध्ये १ हजार ५०० ट्रक,टँकर चालक रस्त्यावर उतरले. कांदा उत्पादनात देशात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्यातहि संप पुकारण्यात आला आहे जिल्यातील सुमारे दीड हजार ट्रक व टँकर चालक संपात सामील झाले आहेत . याचा मोठा परिणाम फळे,भाजीपाला व पेट्रेल टंचाई वर होत आहे.पेट्रोल तसेच डिझेल मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्यास सुरवात होत आहे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार,जळगाव तसेच मराठवाड्यातील वाहतूक संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत . मराठवाड्यातहि संपाचा परिणाम मराठवाड्यातील धाराशिव,हिंगोली,,नांदेड,लातूर या जिल्यात हि संपाचा परिणाम दिसून आला असून लोक पेट्रेल, डिझेलसाठी पेट्रोल पंपावर लांबच्यालांब रांगा लागत आहेत . खरतर काल दुपारपासूनच टंचाईची बातमी व्हाट्सअप वर फिरत होती लोकांनी तेव्हापासूनच पंपावर गर्दी करायला सुरवात केली होती . नागपूर विदर्भातील ट्रक चालकांचा संप मागे नागपूरसह विदर्भातील संघटनांनी संप मागे घेतला असून आता वाहतूक व पुरवठा पूर्ववत होणार आहे .इंधन पुरवठाहि पूर्ववत होत आहे. काय आहे नव्या कायद्यात नव्या हिट अँड रन कायद्यात अपघातात दोषी आढळल्यास १० वर्षाची शिक्षा आणि ७ लाखाच्या दंडाची तरदूत या नव्या कायद्यामध्ये केली आहे. ज्या विरोध ट्रक व टँकर चालकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments