Friday, August 8, 2025
HomeMain Newsशेअर बाजारात मोठी तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

शेअर बाजारात मोठी तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि परकीय गुंतवणुकदारांच्या उत्साहामुळे भारतीय शेअर बाजारात  मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) 49 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला. भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे.

आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्सने सुरुवातीच्या सत्रात 400 अंकांची उसळी घेतली. या तेजीत आयटी कंपन्यांच्या समभागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे सेन्सेक्स 49, 260.21 चा ऐतिहासिक स्तर गाठला. तर निफ्टीमध्येही 112.45 अंकांची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी 14,459.70 च्या स्तरावर पोहोचला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments