Tuesday, March 10, 2026
HomeMain Newsशिवतिर्थाचे काम कोणी मंजूर केले यावरून दोन्ही राजांमध्ये श्रेवाद रंगाला

शिवतिर्थाचे काम कोणी मंजूर केले यावरून दोन्ही राजांमध्ये श्रेवाद रंगाला

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील अर्थात शिवतीर्थावरील सुशोभीकरणाचे काम बरेच वर्षांपासून रखडलेले आहे . ऐत्याशिक शिवतिर्थाचे काम मार्गी लावण्यासाठी अनेक शिवभक्तानी आदोंलने केली . आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुरावा करून राज्य शासनाच्या विशिष्ट पूर्ण योजनेतून आठ कोटी रुपये निधी मंजूर केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी करायला सुरुवात केली . याचबरोबर या संदर्भाचा आढावा घेऊन तातडीने शिवतीर्थ शुशोभीकरणाचे काम सुरु करा अशा सूचना आमदार .श्री . शिवेंद्रराजे यांनी सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत . असे पत्रक प्रशिध्द करण्यात आले आहे . याला प्रत्युत्तर म्हुणुन श्रीमंत छत्रपती खा . उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्राचा दुजोरा देऊन १६ कोटी १४ लाख रुपये शिवतीर्थाच्या विकासासाठी मंजूर करून आणलेलाचा दाखला दिलेला आहे . असे पत्रक खा . उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हारल  करायला सुरवात केली आहे . शिवतिर्थाचे काम सुरु होण्याअगोदरच श्रेयवादात चढाओढीस सुरवात झालेली आहे . काम कोणीही करू परंतु राजधानी साताऱ्याचे नाक असलेल्या पोवई नाक्यावरील शिवतिर्थाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे हीच सातारकरांची   इच्या आहे .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments