Friday, August 8, 2025
Homeसाताराविलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू

विलासपूर येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू

सातारा शहरा लगतच्या विलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना कॅमेराबद्ध झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. म्हणून वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सातारा शहरालगतच्या डोंगर भागामध्ये हिंस्त्र प्राणी वाढत्या शहरीकरणामुळे थेट मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. आठ दिवसापूर्वी माची पेठेमध्ये तीन तरस थेट मानवी वस्तीत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी तरसाएवजी बिबट्याने थेट साई कॉलनी येथून भर रस्त्यावरून कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विलासपूर येथून उंटाचा डोंगर हा वनविभागाचा परिसर नजीक असल्यामुळे येथे बिबट्याचा सर्रास वावर आढळतो. वनविभागाच्या हद्दीलगत सातारा शहराच्या हद्दीतील कोल्ह्यांचे क्षेत्र वाढल्यामुळे बिबट्यांचा कॉरिडॉर प्रभावित झाला आहे. साई कॉलनीच्या एका बंगल्यामध्ये सीसीटीव्ही असल्याने हा थरारक प्रकार चित्रित झाला आहे.  दादासो तुपे हे  घराबाहेर फिरत असताना कुत्र्याची दोन पिल्ले रस्त्यावर होती. त्यावेळी बिबट्याने अचानक तेथे येऊन पिल्लांवर हल्ला केला आणि त्यातील एक पिल्लू पळवले. त्यामुळे साई कॉलनीमध्ये रात्री शतपावलीसाठी फिरणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे. सातारा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांना या घटनेची कल्पना देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी वन विभागाचे पथक या भागाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments