सातारा शहराशेजारी असलेल्या महामार्गावरील खिंडवाडी परिसरमध्ये एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मुर्त्यू झाला आहे . सदरची घटना शुक्रवारी रात्री घडली असून वन्यविभाच्या माध्यमातून रात्री उशीरापर्यंत या घटनेचा पंचनामा सुरु होता . या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु असल्याची माहिती वनविभाच्या माध्यमातून देण्यात अली .. खिंडवाडी परिसर अजिक्यताऱ्याच्या किल्याच्या पूर्वेच्या पायथ्याशी आहे . सदरचा परिसर निर्मनुष्य व घनदाट झाडीचा असल्याने या परिसरामध्ये अनेक वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्यांचे अनेकदा दिसून आले आहे . त्याचबरोबर वन्यजीवांच्या भक्षासाठी अनेकदा बिबटे सुद्धा येत असतात . मात्र खिंडवाडी परिसराच्या लगतच पुणे राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हा महामार्ग ओलांडताना अनेकदा वन्यजीवांचे मुर्त्यू होत असतात . त्याच पद्धतीने बिबट्या देखील वाहनाच्या धडकेमध्ये मुर्त्यूमुखी पडला आहे . खिंडेवाडी परिसरात अशा अनेकदा घटना घडत असून वन्यविभागणे तात्काळ याची दखल घेत वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी प्राणी मित्रातून होत आहे .