राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे . मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर पकडला आहे . मागच्या दोन -तीन दिवस सतत या भागात पाऊस पडत आहे . महाबळेश्वर मध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे काही पर्यटन स्थळे हि पर्यटकांसाठी बंद आली आहेत . यापैकीच एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे . या धोकादायक पर्यटन स्थळाकडे जाण्याचे टाळा असे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे . वेण्णा नदीवरचा पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यामुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे . धबधब्याने रौद्र रूप धारण केले आहे . याठिकाणी पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटनासाठी हा धबधबा बंद करण्यात आला आहे . जीवाची परवा न करता इथे जाणे हे धोकादायक ठरू शकते म्हणून जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात अली आहे .



