पाकिस्तान मधून साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले कि ,पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील शेतकरण्यापेक्षा पाकिस्तानी शेतकरांची जास्त चिंता आहे .देशातील पाच कोटी उस उत्पादक शेतकरांचे सुमारे 30 हजार कोटीचे देणी प्रलंबित आहेत .ती सरकारने त्वरित द्यावीत.२० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी ५५ रुपया ऐवजी १०० रुपये अनुदान द्यावे .५० लाख टन साखरेचा बफर साठ करवा .इथीनॉलचे दर प्रती लिटर ५३ रुपया पर्यत वाढवावा आणि कारखान्या कडून सुरु असलेली कर्जाची वसुली त्वरित थाबवावी कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे त्याच्या सूचना रिजर्व बँक व नाबार्डला सरकारने द्याव्यात अशी मागणी केली .सकुमा नावाच्या दिल्हीच्या कंपनीने पाकिस्ताला चॉकलेट निर्यात केली .त्या बदल्यात २० हजार क्विंटल साखर विना शुल्क आयात केली .असा आरोप करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्थरिय चौकशी कारवी व उस उत्पादक शेतकरण्याना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली .