Friday, August 8, 2025
HomeMain Newsमुंबईतील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का; कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का; कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता. त्यापाठोपाठ सेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आउटगोईंग सुरु झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी शनिवारी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हेमेंद्र मेहता यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले आणि आज अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्याच्या मोहिमेत मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments