Friday, August 8, 2025
HomeMain Newsमी_दाभोळकर

मी_दाभोळकर

“मी माझ्याच लोकांपासुन वाचण्यासाठी पोलिसांचं संरक्षण घेऊ काय ?
जर मला पोलिस संरक्षणाची गरज लागत असेल तर मी निश्चितपणे काही वाईट करतो आहे.
माझा लढा हा समाजाविरुद्ध नसुन समाजासाठी आहे..!”
– डाॅ.नरेन्द्र दाभोळकर..

पाच वर्षांपुर्वी पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदीराच्या जवळ सकाळी 7:20 वाजता दोन माथेफिरु तरुणांनी दाभोळकरांवर गोळीबार केला.
काय गुन्हा होता दाभोळकरांचा ?

दाभोळकर हे व्यवसायाने डाॅक्टर,राष्ट्रीय स्तरावरचे कबड्डीचे खेळाडु होते.त्यांना राज्य शासनाचा क्रिडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा भेटला आहे.
(तसंच मृत्युनंतर त्यांना सामाजिक कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आलं आहे.)
12 वर्ष डाॅक्टरीचा व्यवसाय करताना त्यांच्या लक्षात आलं की गरीबीमुळे कैक लोक आजाराचा इलाज करण्यासाठी डाॅक्टर कडे न जाता भंपक बुवाबाजांकडे जातात.
पुढे पुढे त्यांना समाजात असलेल्या अंधश्रद्धेने,धर्माच्या नावाखाली केल्या गेलेल्या कर्मकांडाने,समाजातील अशिक्षितपणाने स्वतःकडे आकर्षित करुन घेतलं.
डाॅ.दाभोळकर अंधश्रद्धेविरोधात लढु लागले.
समाजाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत बुवाबाजीचं दुकान थाटणार्या कैक बाबांना दाभोळकरांमुळे आपलं बस्तान बांधुन पोटापाण्यासाठी कामंधंदे करावे लागले.

डाॅ.दाभोळकरांनी कैक स्वयंघोषित संतांची भांडेफोड समाजमाध्यमांसमोर केली उदाहरणार्थ हा नाणिजच्या नरेंन्द्र महाराजांचा अवतारवादावर केलेला दाभोळकरांचा सवाल जवाब.. (https://youtu.be/uSvHUNDOehU)
सदरील व्हिडीओ मधे नरेन्द्र महाराज स्वतः देव नसल्याचा निर्वाळा देत आहेत परंतु त्यांच्या संस्थानात आजही कैक अशिक्षित,सुशिक्षित,उच्चशिक्षित त्यांना देव मानुन दर्शनासाठी तासनतास खडे असतात.
अशा अनेक बाबांची भांडेफोड डाॅ.दाभोळकरांनी केली आहे.

दाभोळकरांवर एक आरोप असाही केला जातो कि ते फक्त हिंदुंवर टिका करत होते.
हे सारासार खोटं आहे.
दाभोळकर सर्व धर्मांतील अंधश्रद्धेविरुद्ध कार्यरत होते दाभोळकरांची You Tube वरची सर्व भाषणं आणि त्यांची सर्व ग्रंथसंपदा जर आपण पाहीली तर वरचा केला जाणारा आरोप हा धादांत खोटा आहे हेच निदर्शनास येईल.
या उलट मुस्लिम अंधश्रद्धे विरोधात आयुष्यभर लढा देणारे आणि महाराष्ट्रीयन मुस्लिमांनी आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत शिक्षण घ्यावे असं आवाहन करणारे मुस्लिम सुधारक ‘हमिद दलवाई’ यांच्या आयुष्यातुन प्रेरणा घेऊन डाॅक्टर दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव ‘हमिद’ ठेवलं या कडे हे आरोपकर्ते सरळ सरळ दुर्लक्ष तरी करतात किंवा संकुचित वृत्तीने ते म्हणतात की दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नावही मुस्लिम ठेवले असुन ते मुस्लिम धार्जिणे आहेत.
काय म्हणावे अशा धादांत ढोंगी आरोपकर्त्यांना ?
यांची संकुचित वृत्ती यांना सुखाने जगु देणार नाही.

दाभोळकरांनी ज्या जादुटोणा विरोधी कायदासाठी लढाई लढली होती त्या कायद्याला “भारतीय जनता पक्ष” आणि ‘शिवसेना’ या दोन हिंदुत्ववादी राजकीय संघटनांनी जोरदार विरोध केला होता.
सरतेशेवटी बिल मंजुर झालं.
दाभोळकरांवर विक्षिप्त लेखही शिवसेनेच्या सामना मधुन या काळात छापुन यायचे.
दाभोळकरांनी स्वतः हे प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्पष्ट केलं होतं की “जादुटोणा विरोधी विधेयकामधे धर्म आणि हिंदुत्वावर काहीही लिहीलं नाही अथवा हे दोन शब्दही त्या विधेयकामधे नाहीत..”

दाभोळकर म्हणायचे माझ्याच लोकांपासुन मला संरक्षणाची काय गरज ?
पण त्यांना बरेच लोक आपलं मानत नव्हते याचं मोठ्ठं उदाहरण म्हणजे दाभोळकरांचा दिवसाढवळ्या झालेला खुन…!!!
बरं सोशल मिडीयावर आजही बरेच भरकटलेले तरुण दाभोळकर पानसरे कलबुर्गी लंकेश यांच्या हत्यांचा आनंद साजरा करत असतात.
अशांनी डोळ्याखालुन धर्माची तत्वज्ञाने जरी घातली तरी यांना कळेल की आपण एखाद्याच्या मृत्युचा आनंद साजरा करणे म्हणजे क्रुरतेची परिसिमा आहे.
काही वर्षांपुर्वी आमचाच एक वर्गमित्र दाभोळकरांबद्दल असलेल्या गैरसमजामुळे आणि सोशल मिडीयावरुन भडकुन.. “दाभोळकरांची हत्या चौकात चाबकाने फोडुन करायला हवी होती..” असा बोलला होता.
अशी अनेक उदाहरणं आहेत.
हत्या झाल्यानंतर एक वर्षानंतर तर कट्टरतावादी तरुणांमधे सोशल मिडीयावर दाभोळकरांना शिव्या देण्याची स्पर्धाच लागली होती.

हे तरुण फक्त दाभोळकरांच्या हत्येचं समर्थनच नव्हते करत तर अप्रत्यक्षपणे हे सांगत होती की उद्या गरज पडली तर अजुन हत्या झाल्या तरी चालतील.
जे झालं पुढे.. पानसरे,कलबुर्गी,गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली आणि याही हत्यांचं समर्थन सोशल मिडीयावर बर्याच ठिकाणी झालं.
समाज नक्की चाललाय कुठे ? हा प्रश्न यावर पडतो.
एखाद्या विचारवंताच्या हत्येचं समर्थन जर देशातला तरुण करत असेल तर तरुणांची माथी भडकवण्याचे उद्योग देशात राजरोसपणे सुरु आहेत हे ध्यानात घ्यायला हवंय.

परवा दाभोळकरांचा एक मारेकरी सापडला म्हणे.. 5 वर्ष लागली तपाससंस्थांना एक मारेकरी शोधायला याचं आश्चर्यही तेवढंच आहे.
बरं नेमकं पाचव्या स्मृतीदिनाआधीच तो कसा सापडला हे ही मनात एकवार येऊनच जातं.
असो तो सापडला हे ही नसे थोडके.

दाभोळकरांच्या हत्येनं या कट्टरतावाद्यांनी काय साधलं ?
सरदार भगतसिंह म्हणाले आहेत “व्यक्ती मारु शकता पण व्यक्तीचे विचार मारणं अशक्य आहे..!”
दाभोळकरांच्या मृत्युनंतर दाभोळकरांबद्दल वाचणारे वाढले,दाभोळकरांचं कार्य समजुन घेणारे वाढले आणि दाभोळकरांचा विचार तेवत ठेवणारेही वाढले आहेत.
म्हणजे दाभोळकर नावाचा व्यक्ती यांनी जरी मारला असेल तरी दाभोळकर हा विचार ते मारु शकले नाहीत किंबहुना दाभोळकर हा विचार जोराने फोफावत आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे दाभोळकरांचे विज्ञानवादी विचार अनुसरणारा तरुण वर्ग वाढला आहे.
दाभोळकरांचं साहीत्य आज प्रामुख्याने तरुण वर्ग वाचतो आहे हे दाभोळकरांचं यश आहे.

शेवटी काय तर दाभोळकरांना मारुन दाभोळकरांचे विचार संपत नसतात तर त्या विचारांचा भडका उडुन महापुर येत असतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments