अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांवर ताशेरे ओढण्याचे काम आपल्या संतांनी केले लोकांमध्ये जागृती करण्यासाठी कीर्तन प्रवचन केली तिर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे अनेक संदेश दिले त्यांचे अवलोकन आपल्या महामानवांनी केले देव दगडात नसून माणसात आहे. असे अनेक महामानवांनी संतांनी सांगितले.
त्यानंतर जिजाऊ माँ साहेब यांनी सतीप्रथेला अनिष्ट रूढींना कडाडुन विरोध केला सावित्रीमाईंनी केशवफन अशा गोष्टींवर प्रहार केला लोकमाता अहिल्यामाई होळकरांनी वैदिक पुरोहितांना उद्दैशुन भटभिक्षुक आहात धर्माने जगा हरामखोरी करू पहाल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही अश्या शेलक्या शब्दात वैदिक पुरोहितांची कानउघडणी केली होती आणि अश्या विद्रोही विचारांनी प्रभावित होऊन सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना न जुमानता त्यांना फाटा देऊन विधवांना विधवेचं जीवन जगू न देता त्यांना फक्त स्त्री म्हणून जगू द्या असा संदेश देत आहे एक संघटना या संघटनेचं नाव आहे उन्नती महिला विकास सामाजिक संस्था ही संघटना चालवतात इंजि. अनिता पाटील यांचा मुख्य उद्देश आहे कोणतीही स्त्री ने विधवेचं जीवन जगू नये. कारण त्यांच्या आईंच्या वाट्याला तेच जीवन आले आहे पण त्या त्यांच्या आईंला विधवेच जीवन जगू देत नाहीत हळदीकुंकू लावून त्यांचा सन्मान करतात गेल्या संक्रांतीला त्यांनी सर्व विधवांचा हळदीकुंकू लावून व ओठी भरून सन्मान केला आजपर्यंत कुणी ही अशाप्रकारे सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगतात पण आचरणात आणत नाहीत त्यांनी त्याची मुहूर्तमेढ दुष्काळ ग्रस्त माणदेशात रोवली आणि त्याची सुरवात घरापासून केली.
आटपाडीमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे पण दारूचा दुष्काळ नाही अश्या त्या कायम म्हणत असतात दारूमुळे कित्येक आया बहिणींचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्यामुळे दारूबंदी ही आटपाडीमध्ये व्हावी हे आमचं उदिष्ट आहे आमच्या ही घरचे दारू मुळे अतिशय हाल झाले आहे असे त्या सांगतात
पण हे हाल पुन्हा कोणत्या गरिबांच्या वाट्याला येऊ असे उन्नती महिला विकास संघटनेला वाटते असे त्या म्हणाल्या.
महिलांचं सक्षमीकरण व्हावं बालविवाह बंद व्हावा महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात.
त्या लोकांना जागृत करताना सांगतात गाडगेबाबांनी जी देवाची संकल्पना मांडली ती च माझी आहे देव दगडात नसून माणसात आहे त्यामुळे स्त्रियांना माणुस म्हणुन जगता आले पाहिजे विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या बहिणीचा पुण्रविवाह केला आहे.