Monday, March 2, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी करत आहेत आत्महत्या!

महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी करत आहेत आत्महत्या!

शेतकऱ्यांच्या समस्या राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही संपलेल्या नाहीत. राज्यातील १३०७ शेतकऱ्यांनी जानेवारीपासून आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज ७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. फडणवीस सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरीही थांबलेल्या नाहीत.

१३९८ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्या होत्या. हा आकडा यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास ९१ ने खाली आला आहे. पण राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ४७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील ४५४ शेतकऱ्यांनी त्यांचे आयुष्य संपवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात ५९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

गेल्या वर्षी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास ३८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. पण लाखो शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही कर्जमाफीचा लाभ पोहोचला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँका शेतकऱ्यांना जुन्या कर्जाची परतफेड न केल्याने नव्याने कर्ज देण्यास तयार नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments