तीनशे फूट खोल दरीत अठरा तासाहून अधिक काळ अडकलेल्या युवकास जीवदान मिळाले . अमृत रांजणे हा ३५ वर्षाचा युवक हा नवी मुंबई येथे एका कंपनी मध्ये कामास आहे . तो कंपनीतील सहकाऱ्यांसोबत महाड येथे आला होता . शनिवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मूळ गावी जाण्यासाठी महाड येथून पोलाद पूर येथे आला . येथून तो एका खाजगी वाहनाने महाबळेश्वर कडे निघाला . वाहन अंभेनळी घाटात आल्यानंतर तो त्या वाहनातून खाली उतरला . ते वाहन पुढे निघून गेली व तो घाटात तिथेच दरीच्या टोकावर तो बराच वेळ उभा राहिला होता . दरीत पाहण्याच्या नादात त्या युवकाचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला . दरीत घसरत जाऊन तो तीनशे फूट खोल दरीत खाली गेला . त्याने वाचवण्यासाठी आवाज दिला परंतु रात्र झाल्यामुळे कोणीच प्रतिसाद दिला नाही . रविवारी सकाळी एक नव दांपत्य त्याच ठिकाणी सेल्फी घेत असताना त्यांना वाचावा वाचावा असा आवाज आला . त्यांनी तातडीने महाबळेश्वर पोलीस स्टेशन ला फोन करून हि माहिती दिली . महाबळेश्वर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रॅकर्सना बोलावले . ट्रेकरच्या जवानांनि बचाव कार्याचे साहित्य घेऊन घटना स्थळी धाव घेतली . ट्रेकर्सचे जवान अनिल केळघने ,नगरसेवक कुमार शिंदे ,सुनील भाटीया ,सुनील वाडकर ,अमित कोळी ,संदीप जांभळे ,जयवंत बिरामने यांनी चार तासाच्या प्रयत्न्न करून त्या युवकाला जीवदान दिले . महाबलेश्वर ट्रेकरच्या जवानांचे महाबलेश्वर मध्ये कौतुक होत आहे .