Saturday, August 9, 2025
HomeMain Newsमराठवाड्यातील ग्रामपंचायत ‘आप’ने जिंकली

मराठवाड्यातील ग्रामपंचायत ‘आप’ने जिंकली

आता महाराष्ट्रात दिल्लीच्या आम आदमी पार्टी (आप) या पक्षाने खाते खोलले असून आपचे सात पैकी पाच उमेदवार लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत निवडून आले आहेत. ट्विटरवर याबाबतची माहिती आपचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी दिली आहे. आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या या ट्विटला उत्तर देत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मराठीत ट्विट केले आहे.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात 7 पैकी 5 जागांवर आपच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन, असे ट्विट अजिंक्य शिंदे यांनी केले. या ट्विटला केजरीवाल यांनी मराठीत उत्तर दिले असून विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा’, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments