नेता म्हटलं की, समोर एक छब्बी निर्माण होते. एक ऐशोरामाचे जीवन जगणारे व निर्धास्त नेतृत्व. परंतु, याला अपवाद आहेत, कराड उत्तर मतदारसंघाचे युवा नेते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व नियोजन समिती सदस्य मा.श्री.मनोजदादा भिमराव घोरपडे.
गेली वयाच्या ३८ वर्षांपासून राजकीय वारसा लाभलेले व गेली १० वर्षांपासून राजकीय क्षेत्रात स्वतः कार्यरत असलेले सर्वसामान्य कुटूंबातून आपला राजकीय अग्रलेख अव्याहतपणे वाढत असतानाही तितकेच संवेदनशील, संयमी व सहनशील नेतृत्व म्हणजेच तरूणांचे मार्गदर्शक, अबालवृध्दांचे आशास्थान आणि कराड उत्तर मतदारसंघाचा बुलंद आवाज मा.श्री.मनोजदादा घोरपडे होय.
सातारा जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याचा वरदहस्त नसलेले व स्वबळावर सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत अक्षरशः भुरळ घातलेले हे नेतृत्व म्हणजेच कराड उत्तर मतदारसंघाबरोबरच सातारा जिल्ह्याला लाभलेले निर्विवाद, निरपेक्ष व निर्भीड नेतृत्वच म्हणता येईल.
गेल्या पंचवार्षिक जिल्हा परिषद निवडणूकीत आपले उपजत कौशल्य गुण दाखवत वर्णे गटाची धुरा लिलया सांभाळत वनवासमाची व नागठाणे गटात सुद्धा आपला वरचष्मा त्यांनी बिनदिक्कतपणे दाखवला.तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड निवडणूकीत विजयश्री खेचून आणत आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत एकाच कुटूंबातील जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्य ठेवत जिल्हा नियोजन समितीवर विराजमान होण्याचा बहुमान सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव व प्रथमच मिळविला. गतवर्षी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकांत कराड उत्तर मतदारसंघातील बहुसंख्य ग्रामपंचायती बिनविरोध करण्याबरोबरच एकहाती सत्ता मनोजदादांच्या नेतृत्वाखाली मिळविण्यात आल्या.
गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत कराड उत्तर मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर प्रतिस्पर्धी उमेदवारांबरोबरच सत्ताधारी आमदारांना मनोजदादांनी स्वबळावर सळो की पळो करून सोडले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सर्वसामान्य जनता, नवोदित कार्यकर्ते व मोजक्याच जेष्ठ राजकीय मंडळींच्या जीवावर मनोजदादांनी आपला राजकीय व सामाजिक आलेख दिवसेंदिवस भरभराटीस घेवून गेल्याचे आपल्या निदर्शनास येईल. संघटनात्मक काम करत असताना स्वतंत्र गट निर्माण करणे हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. आजमितीस कराड उत्तर मतदारसंघात ६० % लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचा वरचष्मा मनोजदादांनीच गाजविला असून भविष्यात कराड उत्तर मतदारसंघात आपल्या कौशल्य गुण, मितभाषी स्वभाव, एकसंधता, गोरगरिबांच्या अडीअडचणींची सोडवणूक व सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाच्या जोरावर नेतृत्व गाजवतील यात तीळमाञ शंका नाही.
खटाव माण अँग्रो लिमिटेड साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊसदर देण्याबरोबरच कारखान्यातील मालकी हक्कामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेअर्सच्या माध्यमातून हक्क प्रस्थापित करत होणाऱ्या अडवणूकीतून सुटका करण्याचे समाजोपयोगी काम मनोजदादांनी हाती घेतले आहे. येत्या दिवाळीत व हंगामात ते काम तडीस नेण्यास मनोजदादा समर्थ आहेत.
मनोजदादांच्या पाठीमागे कराड उत्तर मतदारसंघाबरोबरच सातारा जिल्ह्यातून तरूणांची व जाणकार अबालवृध्दांची फौज एकवटत असल्याकारणाने विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे. निवडून आल्यानंतर प्रथमच आमदारांच्या गाडीच्या काचा आपोआपच चौकाचौकात खाली होत असून अचानकपणे चहाच्या टपरीवर ब्रेक लागत असल्याचे वृत्तपत्रांतून कराड उत्तर मतदारसंघातील सुशिक्षित व संवेदनशील मतदारांना समजले. सर्वत्र याच घटनाक्रमाची चर्चा चौकात व पारावर रंगत आहे. इतका धसका विद्यमान आमदारांनी घेतला असून कराड उत्तर मतदारसंघातील सुज्ञ मतदार येत्या २०१९ च्या पंचवार्षिक विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदारांना *”दे धक्का देणार”* याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.