Friday, August 8, 2025
Homeदेशमणिपूर आणि गोवा येथे लोकशाहीला पायदळी तुडविणारी भाजप कर्नाटकात जनमताचं ढोंग करत...

मणिपूर आणि गोवा येथे लोकशाहीला पायदळी तुडविणारी भाजप कर्नाटकात जनमताचं ढोंग करत आहे.

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, कर्नाटकी जनतेने कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने राज्यात त्रिशंकू परिस्तिथी निर्माण झाली आहे. २२२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०४, कॉंग्रेसला ७८, जेडीएस ३८ आणि अपक्ष २ याप्रमाणे जनतेने कौल दिला आहे. ११३ जागांची Magic Figure कुठल्याच पक्षाला गाठता न आल्याने सत्तास्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
राजकीय संकेतानुसार निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष सरकार बनविण्यासाठी राज्यपालांना विनंती करतो व राज्यपाल संपूर्ण परिस्थितीचा योग्य अभ्यास करत, स्वतःच्या विवेकबुद्धी चा वापर करून बहुमत सिद्ध करून दाखवण्याचे संबंधित पक्षाला आदेश देतात. राज्यपालांच्या या आदेशाला कोर्टात Challenge करता येत नाही. मात्र कर्नाटक मधील निकालांनंतर घळत असलेल्या संपूर्ण नाट्यमय घडामोडी ह्या लोकशाहीला मारक ठरत आहेत. यात कर्नाटकचे राज्यपाल ‘वजुभाई वाला’ हे भाजपला झुकतं माप देत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.
कॉंगेस ने विनाशर्त जेडीएस ला पाठींबा दर्शविला आहे आणि जेडीएस च्या कुमारस्वामी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निर्देशित केले आहे. कुमारस्वामी यांनी सर्वप्रथम राज्यपाल यांना भेटी साठी वेळ मागितली असता त्यांना ५:३० वाजताची वेळ देण्यात आली, मात्र राज्यपाल यांनी भाजप चे नेते येडीयुरप्पा यांना ५ वाजता भेटी करिता बोलावले, यामुळे कॉंगेस आणि जेडीएस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापनेसाठी ८ दिवसांचा कालावधी राज्यपाल यांच्याकडे मागितला आहे व राज्यपाल यांनी तो मान्य केला आहे, राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने भाजपने राज्यपाल यांच्याकडे केलेली मागणी एकवेळ रास्त जरी धरली तरी याच भाजपने मणिपूर आणि गोवा येथे हेच राजकीय संकेत आणि जनमत अक्षरशः पायदळी तुडविले आहे. आम्ही ठरवू तो कायदा या न्यायाने सध्या भाजप वागत आहे.
मणिपूर राज्यात ६० जागांपैकी कॉंग्रेस ला २८ तर भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या, गोवा येथे सुद्धा ४० जागांपैकी कॉंग्रेस ला १७ आणि भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या, या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र भाजपने सत्तेचा गैरवापर करत राजकीय संकेत आणि लोकांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिथे स्वतःचे सरकार स्थापन केले आणि चुकीचा पायंडा पाडला.
भाजप सोयीनुसार राजकारण करते, लोकशाही किंवा जनमत हे फारस भाजपला रुचत नाही, कारण भाजपला जनतेचा कौल असो किंवा नसो भाजप घोडेबाजार करत सत्तेत येते आणि लोकशाहीची उघडपणे पायमल्ली करत असते हे भाजपचे धोरण आहे.
कर्नाटक मध्ये कॉंग्रेस आणि जेडीएस मिळून आज देखील बहुमताचा आकडा पार करत सरकार बनवू शकतात मात्र राज्यपाल त्यांना संधी देणार नाहीत हे स्पष्ट आहे, कारण राज्यपालांची भाजपशी एकनिष्ठता फारच खोलवरची आहे. राज्यपालांनी भाजपला ८ दिवसांचा अवधी देवून उघडपणे घोडेबाजाराला समर्थन दिले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments