सातारा शहरातील राजवाडा बस स्थनाकावरील कर्नाटक राज्यातील बस उतारास लागल्याने थेट बस स्थानकासमोर उभ्या असलेल्या रिक्षावर जाऊन धडकली . यामुळे दोन रिक्षांचा चुराडा झाला . या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे . हि घटना आज सकाळच्या सुमारास राजवाडा परिसरात घडली . घटनासथळावरून मिळालेल्या माहिती नुसार राजवाडा बस स्थानकावर कर्नाटक राज्याची बस उभी होती . हि बस चालू अवस्थेत उभा करून चालक चहा पिण्यासाठी गेला होता . बसचा हॅन्ड ब्रेक फेल झाल्याने बस उतारामुळे पुढे गेली . या बसस्थानकाच्या बाहेर बरीच वर्धळ असते . बरेच प्रवासी या ठिकाणी उभे असतात . त्याचबरोबर या बसस्थानकाच्या बरोबर समोर रिक्षा थांबा आहे . या ठिकाणी नेहिमी प्रमाणे रिक्षाच्या रांगा लागलेल्या होत्या . या बस ने दोन रिक्षांना धडक दिल्यामुळे दोन्ही रिक्षाचा चुराडा झाला आहे . दरम्यान बस चालकाने पळत येऊन बसमध्ये बसल्याने पुढचा अनर्थ टळला . येथील नागरिकांनी वाहक व चालक दोघाना मारहाण केली .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही . सातारा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत .