फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने पोलीस कॉलनीतील राहत्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्म्हत्या केली .ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली .-या घटनेने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे . अच्युत साहेबराव जगताप वय ३१ मूळ राहणार एनकूळ ,तालुका खटाव जि -सातारा असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे .
याबाबत अधिक माहिती अशी , फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गेली सात वर्ष पोलीस हवालदार म्हणून अच्युत जगताप हे कार्यरत होते . रविवारी त्यांचा वाढदिवस होता . सकाळपासून अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्याही दिल्या .दुपारी पोलीस कॉलनीतील राहत्या घरी ते जेवणासाठी गेले . घरातील दार बंद करून राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली . एका तपासाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस त्यांना फोन करत होते . मात्र बराचवेळ ते मोबाईल उचलत नव्हते . सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोन पोलीस त्यांच्या घरी आले . घराबाहेर थांबून त्यांनी रिंग दिली असता मोबाईल वाजत होता . मात्र ,जगताप फोन उचलत नसल्याने खिडकीतुन जाऊन त्यांनी पहिले . तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले . त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले . त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली ,हे अद्याप समोर आले नाही . अच्युत जगताप यांच्या पश्चात पत्नी ,एक भाऊ ,पाच बहिणी ,चार महिन्याचा एक मुलगा असा परिवार आहे . अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार करीत आहेत .