पोवई नाका येथील भुयारी मार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला होता . या फलकाची विटंबना काही अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आली . त्याचा निषेध करत पुन्हा तो फलक खा . छत्रपती उदयनराजे भोसले समर्थकांकडून लावण्यात आला आहे . शुक्रवारी पोवई नाका येथील भुयारी मार्गाचे उद्धघाटन खा . छत्रपती उदयनराजे यांनी करून हा मार्ग साताऱ्यातील जनतेसाठी खुला केला . मात्र शनिवारी सकाळी या मार्गावरील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाच्या फलकाची विटंबना केल्याचे निदर्शनात आले . त्यामुळे खा. उदयनराजे समर्थकांनी या घटनेचा निषेध करत सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला . त्यानंतर पुन्हा या भुयारी मार्गाला श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला .