सातारा येथील शाहू स्टेडियम येथे राष्ट्रध्वज फडकावून १ मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला . महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमीत्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजरोहण समारंभ कार्यक्रम पार पडला . यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती . या निमित्ताने पोलिसांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते . पोलिसांनी परेडद्वारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानवंदना देण्यात आली . यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा ,पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ,सौ संगीता साळुंखे ,जयवंतराव साळुंखे ,भरत देशमुख ,तसेच जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी व स्वातंत्र्य सैनिक ,त्याचे कुटूंबीय व नागरिक उपस्थितर होते . तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट घेऊन शुभेच्या दिल्या . दरम्यान राज्याचे महासंचालक प्राप्त पोलिसांचा सन्मान चिन्ह देऊन गौरण्यात आले . राज्यात कोरोनाच्या पार्शभूमीवर दोन वर्षानंतर निर्बध शिथिल करण्यात आले आहेत . महाराष्ट राज्याची उन्नती व्हावी ,यासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान आहुती दिली . सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आ . यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते राज्याचा मंगल कलश आणण्यात आला . आज जिल्हा परिषेदेच्या स्थापनेला हि ६० वर्ष पूर्ण होत आहेत .



