Saturday, August 9, 2025
HomeMain Newsपालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अमंलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी सातारा शहरातील पोवई नाका, मोती चौक, एस.टी. स्टॅन्ड परिसराची पहाणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट, यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अमंलबजावणी करा, अशा सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री श्री. पाटील यांनी पाहणी दरम्यान केल्या.

यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी नगर परिषदेच्या पुज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथे सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments