सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले आहेत . विधानपरिषदेचे आमदार शिशिकांत शिंदे यांचा १ मतांनी पराभव झाला आहे . रांजणे यांनी आमदार शिंदे यांचा पराभव केला आहे . शिशिकांत शिंदे यांना २४ मते तर रांजणे यांना २५ मते मिळाली आहेत . पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर ५८ मते मिळवून विजय झाले आहेत . माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र आहेत . महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे . गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ४४ तर सत्यजितसिंह पाटणकर यांना ५८ मते मिळाली आहेत .
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून महसूल मंत्री तथा बाळासाहेब पाटील हे ७४ इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा ८ मतांनी पराभव केला आहे . या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते . येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिह पाटील यांच्यात झाली होती . बाळासाहेब पाटील यांना ७४तर उद्यासिह पाटील यांना ६६ मते मिळाली आहेत . येथे एकूण ७४ मते होती . मात्र मतदानादिवशी ७२ मतदान झाले होते . दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती .
खटाव सोसायटी गटात धक्कादायक निकाल लागला आहे . कारण या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमदेवार दिलेल्या नंदकुमार मोरें यांचा पराभव झाला आहे . प्रभाकर घार्गे यांनी त्यांचा पराभव केला आहे . नंदकुमार मोरेना ४६ तर प्रभाकर घार्गे यांना ५६ मते मिळाली आहेत .
बँक व पतसंस्था गटात रामराव लेंभे विजयी झाले आहेत . रामराव लेंभे यांना ३०७ तर सुनील जाधव यांना ४७ मते मिळाली आहेत . इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून शेखर गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे . प्रदीप विधाते यांनी गोरे यांना पराभवाची धूळ चारली . शेखर गोरे यांना ३७९ मते मिळाली तर प्रदीप विधाते यांना १४५९ मते मिळाली आहेत . गोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे .
महिला प्रवर्ग गटात रास्त्रवाढीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी झाल्या आहेत . ऋतुजा पाटील यांना १४४५ व कांचन साळुंखे यांना १२९२ मते
मिळाली . त्यांनी अनुक्रमे शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर यांचा पराभव केला . शारदादेवी कदम यांना ६१८ तर चंद्रभागा काटकर १४१ मते मिळाली आहेत . जिल्हा बँकेच्या २१ जागा पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत . उर्वरित १० जागांसाठी रविवारी दि . २१ रोजी मतदान झाले . जिल्ह्यातील ११ तालुक्यातून ९६ टक्के मतदान झाले आहे .
शिशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर गोधंळ , करून रास्त्रवाढीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे . हि दगडफेक राष्ट्रवादिच्या सर्मथकांनी केल्याचे सांगण्यात आले . जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असताना रविवारी मतदाना दिवशीच आमदार शिशिकांत शिंदे यांचे व रांजणे यांच्या कार्यकत्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती . जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी ऐकून ४९ मतदारांनी आपला हक्क बजावला होता . त्यापैकी शिशिकांत शिंदे यांना २४ मतं मिळाली असून २५ मतं रांजणे घेत विजय मिळवला आहे