Saturday, August 9, 2025
HomeMain Newsपाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार - सत्यजित पाटणकर

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आम्हीच जिंकणार – सत्यजित पाटणकर

सध्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . या निवडणुकीत विजय नक्की कोणाचा होणार हे दिनांक २० एप्रिल नंतर स्पष्ट  होणार आहे . तत्पूर्वी पाटण कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिह पाटणकर यांनी केला . सत्यजित पाटणकर यांनी पाटण येथे आज माध्यमाशी संवाद साधलाताना सांगितले . यावेळी ते म्हणाले  कि ,पाटण बाजार समितीची निवडणूक सुरु झाली आहे . हि निवडणूक प्रथेप्रमाणे याहीवेळी विक्रमसिंह पाटणकर याच्याच विचारायची राहील . बाजार समितीच्या निवडणुकीबाबतचे खरे चित्र दिनांक २० एप्रिल रोजी स्पष्ट होईल . तरीही आम्ही आमच्या विचारांचे अर्ज भरले असून ही निवडणूक आम्हीच लढून जिकूंन दाखवणार आहोत . पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही  आमच्याकडेच येणार याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे . कारण ही बाजार समिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विचारांनीच राहिली आहे . यात शंका नाही ,असे सत्यजित पाटणकर यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments